शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By वेबदुनिया|

'व्हॉट्स अॅप'साठी 'फेसबुक'ने मोजले तब्बल 19 बिलियन डॉलर्स

WD
न्यूयॉर्क - सोशनल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकची पकड अधिक घट्ट होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे "व्हॉट्‌स अप' ही सध्या अत्यंत लोकप्रिय असलेली मोबाईल मेसेजिंग सेवा फेसबुक कंपनी विकत घेणार असून ही आत्तापर्यंतची फेसबुकची सर्वांत मोठी खरेदी असणार आहे. "व्हॉट्‌स अप' फेसबुक तब्बल 19 अब्ज डॉलर्सना विकत घेणार आहे.

व्हॉट्‌स अप ही सेवा जगभरातील सुमारे 45 कोटींपेक्षा जास्त ग्राहक वापरतात. या तुलनेत ट्विटर ही सेवा सुमारे 24 कोटी ग्राहक वापरतात. व्हॉट्‌स अप लवकरच एक अब्ज ग्राहकांचा टप्पा पार करेल, असा आशावाद फेसबुकचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केला आहे.

व्हॉट्‌स अप आल्यानंतर हा फेसबुकपेक्षा अधिक लोकप्रिय झाला होता आणि फेसबुकसाठी हे फार मोठे आव्हान होते. व्हॉट्‌स अपला विकत घेण्याअगोदर फेसबुकने साल 2012मध्ये इन्स्टाग्राम हे सॉफ्टवेअर 715 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतले होते.