शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जुलै 2014 (17:29 IST)

13 जानेवारीला बंद होणार विन्डोज 7

मायक्रोसॉफ्टचा ऑपरेटिंग सिस्टीम विन्डोज 7चा असणारा सपोर्ट बंद होणार आहे. विन्डोज 7 साठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर अपडेटस्, सिक्युरिटी पॅचेस 13 जानेवारी 2015 पासून मिळण्यास बंद होणार आहे. यानंतर ऑपरेटिंग सिस्टम हँकिंग किंवा वायरस अटॅक सुरक्षित राहणार नाही. मायक्रोसॉफ्टने एप्रिलमध्ये लोकप्रिय ओएस विन्डोज एक्सपीसाठी ही सपोर्ट करण्यास बंद केलेय.

विन्डोज 7 ज्यावेळेस सपोर्ट करण्यास बंद झाले तेव्हा खूप समस्या आल्या होत्या तशाच यावेळी देखील विन्डोज 7 सपोर्ट बंद केल्यानंतरही येणार आहेत. जे कोणी प्रायव्हेट आणि सरकारी सिस्टम विन्डोज 7 वर काम करतात त्याच्यासाठी हॅक होण्याचा खूप धोका आहे. सध्यातरी फक्त मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार आहेत आणि एक्सटेंडेंड सपोर्ट 2020 पर्यंत असणार आहे. मात्र एक्सटेंडेंड सपोर्टसाठी लोकांना पैसै द्यावे लागणार आहेत. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद होणार म्हणजे, अशा काही फ्री सर्व्हिसेस बंद होणे. मेनस्ट्रीम सपोर्ट बंद झाल्यानंतर सिक्युरिटी अपडेटस्ना सोडून बाकी सर्व अपडेटस्साठी यूजर्सना कंपनीला पैसे द्यावे लागतात.

विन्डोज 7चा मेनस्ट्रीम सपोर्ट 14 एप्रिल, 2009 ला बंद झाला तर एक्सटेंडेंड सपोर्ट 8 एप्रिल 2014 ला बंद झाला होता. कंपनी जेव्हा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करते तेव्हा सरकारी संस्थान ऑपरेटिंग सिस्टमशी जोडले गेलेले अपडेटस् मिळविण्यासाठी तर काही वेळापर्यंत सुरु ठेवण्यासाठी कंपनीला पैसै देते, असं केल्याने कंपनीला आपल्या कॉम्प्युटर सिस्टम आणि सॉफ्टवेअर अपडेटसाठी काही वेळ मिळतो. याच कारणाने विन्डोज 7 मेनस्ट्रीम बंद झाली की 5 वर्षापर्यंत त्याचा एक्सटेंडेंड सपोर्ट सुरू असेल.