शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (12:26 IST)

50 लाख गुगल पासवर्ड हॅक

रशियाच्या एका हॅकर्सने 50 लाख गुगल अकाउंटस्चे युजरनेम आणि पासवर्ड ऑनलाइन केले आहेत. यात तुमचाही युजरनेम असू शकतो. चांगली बातमी ही आहे की, ऑनलाइन केल्याने तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड चेक करू शकतात आणि त्वरित बदलू शकतात. रशियाच्या एक बिटकॉइन सिक्युरिटी फोरम btcse.com वर 49.3 लाख युजरनेम-पासवर्डचा डेटाबेस पोस्ट करण्यात आला आहे. हा डेटा पोस्ट करणारा युजर ’tvskit’ ने दावा केला की यातील 60 टक्के माहितीद्वारे तुम्ही लॉग इन करू शकतात. साइबर एक्सपर्टस्चे म्हणणे आहे की,
 
यामुळे तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. या डेटाचे परीक्षण केलेल्या डेन्मार्कच्या साइबर सिक्युरिटी कंपनी CSISचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पीटर क्रूस ने सांगितले की, ‘आम्ही 60 टक्के लॉग-इन करण्याचा दावा मान्य करत नाही. परंतु, या डाटातील मोठा भाग योग्य आहे. CSISच्या रिसर्चनुसार मागील लिक्सचा इतिहास पाहता हा डाटा 3 वर्ष जुना असू शकतो. गुगलने आपल्या सर्व्हरमधून डाटा चोरी होण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. रशियाच्या एका टेक्नॉलॉजी वेबसाइटने सांगितले की, युजरनेम-पासवर्डमध्ये जास्त करून फिशिंग स्कॅम आणि दुसर्‍या लीकमधून चोरी गेलेल्या डाटापैकी समाविष्ट आहे. यात गुगल सर्व्हर हॅकचा कोणताही प्रकार नाही.