मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2015 (09:55 IST)

92 टक्के किशोरवयीन दररोज ऑनलाइन

दिवसेंदिवस ऑनलाइन राहण्याचे प्रमाण अमेरिकेमध्ये वाढत असून नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या एका सर्व्हेद्वारे अमेरिकेतील 92 टक्के किशोरवयीन दररोज ऑनलाइन राहात असल्याची माहिती समोर आली आहे. द प्यू रीसर्च सेंटरने अलीकडेच जाहीर केलेल्या सव्र्हेत ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.
 
अमेरिकेत 13 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांपैकी 73 टक्के मुले स्मार्टफोन वापरतात तर 30 टक्के मुले मोबाइल वापरत असल्याचे आढळून आले आहे तसेच 87 टक्के मुलांकडे संगणक वापरण्याची सुविधा आहे तर 91 टक्के मुले मोबाइलद्वारे दररोज ऑनलाइन असल्याचे आढळून आले आहे. 90 टक्के मुले टेक्स्ट मेसेजचा उपयोग करतात तसेच प्रत्येकाला दररोज 30 एसएमएस प्राप्त होतात.
 
स्मार्टफोन वापरणार्‍या मुलांपैकी एकतृतीयांश मुले मेसेजिंगसाठी व्हॉटसअँप किंवा किकचा वापर करीत असल्याचेही आढळून आले आहे तसेच आरोग्यविषयक माहितीसाठी 62 टक्के स्मार्ट फोनधारक स्मार्टफोनचा वापर करतात. याशिवाय ऑनलाइन बँकिंगसाठी 57 टक्के, स्थावर मालमत्तेविषयक माहितीसाठी 44 टक्के, नोकरी संदर्भातील माहितीसाठी 43 टक्के, शासकीय सेवांबाबतच्या माहितीसाठी 40 टक्के तर शैक्षणिक माहितीसाठी 30 टक्के स्मार्टफोनधारक आपल्या स्मार्टफोनचा वापर होत असल्याचेही या संशोधनाद्वारे समोर आले आहे.