testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अॅमेझॉनचा प्राइम डे सेल

Last Modified मंगळवार, 11 जुलै 2017 (09:22 IST)
अॅमेझॉनने भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी एक सेल आणला आहे. अॅमेझॉन प्राइम डे असे या सेलला नाव देण्यात आले आहे. तसेच हा सेल 30 तास चालणार असून यादरम्यान ग्राहकांना अनेक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

अॅमेझॉनने याआधी भारताशिवाय अशाप्रकारच्या सेलचे दोनवेळा आयोजन केले होते. त्यावेळी कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारतात अॅमेझॉजनने पहिल्यांदाच प्राइम डे सेल आणला आहे. त्यामुळे या सेलला सुद्धा ऑनलाइन ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याचबरोबर कंपनीच्या माहितीनुसार, प्रत्येक पाच मिनिटाला हजाराहून अधिक नवीन डील्स मिळतील. कंपनीचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल यांनी सांगितले. हा सेल अॅमेझॉन प्राइम युजर्ससाठी असून यामध्ये व्हिडिओ कंटेंटशिवाय बराच वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :