गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (08:53 IST)

सरकारी अँटीव्हायरस भारतीयांसाठी मोफत उपलब्ध

डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने आता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस खर्चिक वाटू लागलेल्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेला सरकारी अँटीव्हायरस भारतीयांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 
केंद्राने सायबर स्वच्छता केंद्र या नावाने यंत्रणा उभारून सायबर सुरक्षेस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरणारे संगणक लॅपटाॅप कम्प्युटर, अँड्रॉइड, विन्डोव्स, अॅप्पल या मोबाईल प्रणालीना सुरक्षा कवच प्रदान केले जाणार आहे.
 
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ही व्यवस्था उभी करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा पुरवठादार, बॅँका, क्विकहिल अॅँटी व्हायरस कंपनी आदींच्या सहकार्याने ही व्यवस्था बळकट करण्याचा सरकारचा विचार आहे. सायबर सुरक्षा ही सर्वांनी एकत्र येऊनच नियंत्रित करता येणार असल्याने अनेक घटकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यासाठी इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स पथकाने (सीइआरटी-इन) या केंद्रासाठी ९० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
याबाबत माहिती देताना माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की, भारतीयांनी डिजिटल व्यवहारांत अधिकाधिक सहभागी होत असल्याने सायबर सुरक्षेची व्याप्ती वाढविण्याची गरजेतूनच या नव्या यंत्रणेची सुरुवात करण्यात आली आहे.
 
भारतीयांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या सी-डॅक (सी-डॅक च्या साहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला.) म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटीग (प्रगत संगणन संस्था) या संस्थेने बनवलेल्या या विविध प्रनालींमुळे आपण सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करू शकणार आहोत.
 
त्याची माहिती खालीलप्रमाणे
 
1. USB Pratirodh
 
संगणकाच्या सुरक्षेसाठी असलेल्या या साधनामुळे युएसबी डिव्हाइस (पेनड्राइव्ह,  external hard drives, मोबाईल फोन आणि इतर माहिती साठवणाऱ्या यंत्रणा) द्वारे माहिती आणि मिडिया फाईल्स अदलाबदल करतेवेळी सुरक्षा पुरवली जाणार आहे.
 
Download Link:
https://cdac.in/usbpratirodh
 
2. AppSamvid
 
विन्डोव्स प्रणालीचा वापर होणाऱ्या संगणकांमध्ये एखादे सॉफ्टवेअरचा वापर करतेवेळी या प्रणालीने परवानगी दिल्याशिवाय वापर करता येणे शक्य होणार नाही. या यंत्रणेद्वारे ती आज्ञावली पूर्णपणे तपासून घेतली जाणार आहे.
 
Download Link:
https://cdac.in/appsamvid
 
3. M-Kavach (for Mobile devices)
 
स्मार्टफोन संदर्भातील प्रत्येक तक्रारीला उत्तर म्हणून या अॅपचा वापर करता येणार आहे. वायफाय आणि ब्ल्यूटूथचा वापर करून मालवेअर द्वारे आपली वैयक्तिक माहिती चोरणाऱ्या किंवा अपोआप डिलीट करणाऱ्या यंत्रणेला यामुळे प्रतिबंध बसणार आहे. त्याचप्रमाणे स्पॅम एसएमएस, नको असलेल्या कॉल्स थांबवण्यासाठीही वापर करता येणार आहे.
 
Download Link:
https://cdac.in/mkavach
 
4. Browser JSGuard
 
browser extension असलेल्या या प्रणालीद्वारे संगणकावर होणारे हल्ले थांबविता येणे शक्य आहे. एखादे संकेतस्थळ या मालवेअरसोबत जोडले गेलेले असेल तर तुम्हाला एक इशारा देण्यात येईल आणि त्या पानाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ठेवण्यात येईल.
 
Download Link:
For Firefox Web Browser: https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/browser-jsguard/
For Google Chrome Web Browser:
 
https://chrome.google.com/webstore/detail/browserjsguard/ncpkigeklafkopcelcegambndlhkcbhb