शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

खुशखबर! देशातील 100 रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय

भारतीय रेल्वेने 2016 च्या शेवटपर्यंत देशातील 100 रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय सेवा उपलब्ध करवण्याचे आपले लक्ष्य पूर्ण केले आहे. आता पुढले पाऊल पुढल्या वर्षी 400 मोठ्या स्टेशनांवर फ्री वाय-फाय प्रदान करणे आहे.
रेल मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की 'आम्ही मुंबई स्टेशनापासून सुरुवात केली होती आणि आता कोल्लमलाही फ्री वाय-फाय सेवेने जोडले आहे. असेच गूगलच्या साहाय्याने आम्ही देशातील 100 सर्वात व्यस्त स्थानकांवर नि:शुल्क वाय-फाय सेवा उपलब्ध करण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे.
 
या वर्षी जानेवारीत रेल्वेने मुंबई मध्य स्टेशनावर पहिली फ्री वाय-फाय सेवा सुरू केली होती आणि भुवनेश्वर, बंगलोर, हावडा, कानपूर, मथुरा, अलीगढ़, बरेली, वाराणसी सारखे व्यस्त स्टेशन याहून जोडण्याचे कार्य सुरू ठेवले होते.
 
त्यांनी सांगितले की, 'आमची योजना पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत 400 मोठ्या स्टेशनावर फ्री वाय-फाय सेवा प्रदान करण्याची आहे.