गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 30 एप्रिल 2017 (22:57 IST)

सुंदर पिचाई : सर्वाधिक पगार घेणारी जगातील एकमेव व्यक्ती

गुगलचे  सीईओ सुंदर पिचाई  यांचा वार्षिक पगार तब्बल 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1285,51,00,000 (12.85 अब्ज) रुपये आहे. म्हणजेच त्यांना महिन्याला तब्बल एक अब्ज रुपये पगार मिळतो. वेतन म्हणून इतकी मोठी रक्कम असलेले सुंदर पिचाई हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट 2015 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली होती. 2016 मध्ये त्यांना 198.7 मिलियन डॉलर म्हणजे 12.77 अब्ज रुपयांचे शेअर्स मिळाले होते.