Widgets Magazine
Widgets Magazine

आयडिया सेल्युलर चौथ्या तिमाहीत तब्बल 328 कोटींचा तोटा

सोमवार, 15 मे 2017 (11:49 IST)

रिलायन्स जिओच्या आगमनानंतर आयडिया सेल्युलर कंपनीला 2016-17 च्या चौथ्या तिमाहीत तब्बल 328 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 2016-2017 या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरला एकूण 400 कोटींच्या नुकासनाला सामोरं जावं लागलं आहे. 2015-16 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्युलरने 452 कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. शिवाय, गेल्या आर्थिक वर्षात  आयडिया सेल्युलरचा नफा 2 हजार 728 कोटी होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अहवालानुसार, 2016-17 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 14.3 टक्क्यांची घट झाली असून,  चौथा तिमाहीत 8 हजार 126 कोटींच्या महसुलाची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत 9 हजार 478 कोटींच्या महसुलाची नोंद झाली होती.  2016-17 मध्ये आयडिया सेल्युलरचा महसूल 35 हजार 576 कोटी असून, 2015-16 मध्ये 35 हजार 949 कोटी इतका महसूल होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

ई मेल ब्लॉक करा

फेसबुक, व्हॉट्स अॅप आदी माध्यमं आपल्या युजर्ससाठी ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून ...

news

तुम्ही बघितला आहे का केळ्याच्या आकाराचा ‘बनाना फोन ?

तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर फोनच्या आतापर्यंतचे सर्वात अनोखे व हटके डिझाइन खरेदी ...

news

India : व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्समध्ये सर्वात पुढे!

व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल्समध्येही भारत अग्रस्थानी आहे कारण भारतीय यूझर्समध्ये व्हॉट्‌सऍपचे ...

news

अॅमेझॉनवर पुन्हा एकदा तिरंग्याचा अपमान

अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप ...

Widgets Magazine