शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

आता ‘फायरबॉल’ व्हायरसच्या धोका

‘चेक पॉईंट’ या फर्मने ‘फायरबॉल’ या नव्या व्हायरसच्या धोक्याचा इशारा दिला आहे. फायरबॉल’चा आतापर्यंत जगातील 25 कोटी कॉम्प्युटरवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारताचाही समावेश आहे. ‘वायर्ड डॉट कॉम’ने शुक्रवारी एका वृत्तात म्हटलंय की, ब्राऊजर हॅक करण्यासाठीच ‘फायरबॉल’चं डिझाईन करण्यात आले आहे.

‘फायरबॉल’चा कॉम्प्युटरवर हल्ला झाल्यानंतर डिफॉल्ट सर्च इंजिन असलेल्या गूगलमध्ये बदल होतो आणि बीजिंगस्थित डिजिटल मार्केटिंग फर्म राफोटेककडून यूझर्सच्या वेब ट्राफिकचं नियंत्रण केलं जातं. एकदा या व्हायरसचा हल्ला झाला की, कोणतंही कॉम्प्युटर कुठूनही रन करता येतं आणि कम्प्युटरला हानिकारक असलेल्या फाईल्स डाऊनलोड केल्या जाऊ शकतात.