गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2017 (12:09 IST)

इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात ७४व्या स्थानावर

4 जी इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत भारत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे राहिला आहे. भारतात ४ जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडची सरासरी 5.1 Mbps इतकी आहे. जगाच्या इंटरनेट सरासरीपेक्षा ही सरासरी एक-तृतीयांश पेक्षाही कमी आहे. जागतिक स्तरावर थ्रीजी इंटरनेटची सरासरी 4.4 mbps इतकी असून भारतातील '4 जी'चा स्पीड यापेक्षा फक्त 0.7 mbpsनं अधिक आहे. त्याचवेळी जगातील '४ जी' इंटरनेट स्पीडची सरासरी तब्बल 16.2Mbps इतकी आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४व्या स्थानावर आहे.  भारतापेक्षा पाकिस्तान आणि  श्रीलंका हे देश  पुढे आहेत. ४ जी इंटरनेटच्या स्पीडमध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण कोरियाचा दुसरा क्रमांक लागतो.