मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (17:37 IST)

कॅशलेस व्यवहारासाठी IndiaQR मोड सुरु

कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने  आणखी एक पुढचे पाऊल उचलत  IndiaQR मोड  सुरु केला आहे. IndiaQR एक कॉमन QR कोड आहे. ज्याला सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी मिळून तयार केले आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भारतीय रिजर्व्ह बॅंकेच्या सुचनेनुसार मास्टरकार्ड, वीजा आणि अमेरिकन एक्‍सप्रेस शिवाय नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी रुपेकार्डला चालवते, IndiaQR कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करुन रीटेल पेमेंट करण्याची परवानगी देतो ज्यांच्याकडे डेबिट कार्ड आहे. या कोडच्या माध्यमातून सगळ्या 4 महत्त्वाच्या कार्डची माहिती मिऴवता येणार आहे.
रिजर्व्ह बॅंकने सोमवारपासून IndiaQR लॉंच केले आहे. सुरुवातील 5-8 बॅंक लाइव्ह असतील. हा कोड बॅंकेच्या मोबाईल ऍपवरही काम करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल नसेल अशा जागी सुद्धा पेमेंटसाठी समस्या येणार नाही.
QR Code कसे वापरता येते?
* IndiaQR बॅंकांच्या मोबाईल ऍपवर काम करेल.
* पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनवर मोबाईल बॅंकिंग ऍप असणे गरजेचे आहे.
* त्यानंतर मर्चेंटचा QR कोड स्कॅन करावा लागेल.
* पेमेंट करण्यासाठी मग रक्कमचा आकडा टाकावा लागेल.
* यानंतर पेमेंट झाल्याचा मॅसेज स्क्रीनवर दिसेल.