Widgets Magazine

'भारत के वीर’ साठी 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा

bharat ke veer
Last Modified सोमवार, 31 जुलै 2017 (09:03 IST)

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी गृह मंत्रालयाच्या खात्यात 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे.

‘भारत के वीर’
अॅप आणि वेबसाईट अंतर्गत आतापर्यंत 10.18 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली असून ही समिती निधीचं वाटप कशाप्रकारे करता येईल, याचं नियोजन करणार आहे. अभिनेता
अक्षय कुमारच्या संकल्पनेनंतर
गृह मंत्रालयाने या अॅपची सुरुवात केली होती. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवंअॅप
तयार करण्यात आलं. ‘भारत के वीर’
असं
या
वेब पोर्टलचं नाव आहे.यावर अधिक वाचा :