testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सॅमसंग चे उपाध्यक्ष ली जे योंग यांना अटक

लाचखोरीप्रकरणी सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स कंपनीचे उपाध्यक्ष ली जे योंग यांनी शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. साऊथ कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्यून हेई यांना 40 मिलियन डॉलरची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा योंग यांच्यावर आरोप आहे. दोन कंपन्यांच्या विलिनीकरणासाठी योंग यांना कार्क ग्यून हेई यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, कंपनीच्या उपाध्यक्षांना अटक झाल्याने सॅमसंगच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ही जगातील सर्वात मोटी स्मार्टफोन आणि मेमरी चिप निर्माता कंपनी आहे. कंपनीने कोणालाही लाच देण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच कोरियाच्या अध्यक्षाकडूनही कधीच अपेक्षा केली नसल्याचे सॅमसंगने म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :