गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुक, व्हॉट्स अॅपला सुप्रीम कोर्टाची नोटिस

सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स अॅपचा वैयक्तिक डेटा फेसबुकशी जोडण्याच्या प्रकरणासंबंधी दाखल याचिकेवर केंद्र सरकार, ट्राय, फेसबुक आणि व्हॉट्स अॅपला नोटीस बजावली आहे. व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर असलेल्या ग्राहकांच्या गोपनीय माहितीची संरक्षण व्हावे याकरिता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.
 
ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण होणे जरुरी आहे, याबाबत केंद्राने आपली भूमिका स्पष्ट करावी असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. केंद्राने 2 आठवड्यांमध्ये उत्तर द्यावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 
 
य‍ाचिकाकर्ता करमाया सिंग सरीन यांच्याकडून दाखल याचिकेत म्हटले आहे की व्हॉट्स अॅपची नवीन प्रायवसी पॉलिसीनुसार मेसेजिंग अॅप फेसबुकने लोकांना डेटा शेअर केला जाऊ शकतो. ज्यामुळे खासगी आयुष्य सुरक्षित राहणार नाही म्हणून कंपन्यांनी आमच्या खासगी आयुष्य सुरक्षित राहील याची शाश्वती घ्यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. हे प्रकरण 155 मिलियन लोकांच्या डेटाने जुळलेले आहेत.