शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2017 (14:51 IST)

सोशल मिडीयावर बंधन येणार

फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर , स्काईप, जी-टॉकसारख्या  क्रेंद्र सरकार निर्बंध घालण्याची शक्‍यता आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.तर आपल्या देशात फोन, मोबाईल या सारख्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्राय ही संस्था निर्मित आहे. मात्र  यासारखी वेगळी आणि स्वतंत्र अशी   सोशल मीडिया सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा असावी अशी सरकारची भूमिका आहे ती कोर्टापुढे ठेवली आहे . या नवीन संस्थेच्या अंतर्गत फेसबुक, व्हॉट्‌सऍप, स्काईप, जी-टॉकसारख्या, याहू, लाइव संवाद त्यासारख्या सर्व अश्या  सेवांचा यात समावेश सरकार करणार  आहे. तर या व्यवसायीक कंपन्या बिना रोक टोक आणि विना बंधने सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या संवादावर आणि त्याच्या डेटाचा उपयोग या कंपन्या व्यावसायिक वापरासाठी करत होत्या त्यावर कोट्यावधी रुपये कमवत आहेत .त्यामुळे बिना निर्बंध असलेल्या या सर्व कंपन्यावर  त्यावर निर्बंध घालण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सरकारचे मत मागवले होते.त्यामुळे काही दिवसात जर मसुदा तयार झाला तर सरकार लवकरच सोशल मिडियावर बंधने टाकनार आहे.