testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोशल मीडियावर शिवीगाळ करणार्‍यांना दंड

social media
जगभरात सोशल मीडियाचा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे. त्यामुळे जग जवळ आले असले तरीही या माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा महाभागांना छाप लावण्यासाठी सरकारने जबर तदंडाची तरतूद केली आहे. समाजमाध्यमांवर करणाऱ्यांबरोबरच अश्लील मजकूर पोस्ट करणे, इतरांची गुपिते जाहीर करणे, फेक अकाऊंट उघडणे, अवमानकारक मजकूर पोस्ट करणे यासाठीही दंड ठोठावला जाणार आहे.
मिनिस्ट्री ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन्सच्या वतीने एक परिपत्रक जरी करण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की; कोणत्याही व्यक्तीने समाजमाध्यमांवर खोटी माहिती दिल्यास, कोणत्याही व्यक्तीसाठी अथवा संस्थेसाठी अवमानकारक असलेला मजकूर प्रसिद्ध केल्यास ३ ते ५ कोटी व्हिएतनामी डाँग एवढा दंड थाठविला जाईल.

व्यक्ती अथवा संस्थेची गुप्त माहिती तिच्या परवानगीशिवाय उघड करणे, अश्लील मजकूर प्रसिद्ध करणे, मानवी हत्या अथवा कोणत्याही दुर्घटनेची अनावश्यकरीत्या विस्तृत माहिती देणे, अंध:श्रद्धा फैलावणे यांनाही दंड आकाराला जाणार आहे. तसेच इतरांची छायाचित्र अथवा ओळख वापरून खोटे अकाऊंट उघडणे हादेखील दंडनीय अपराध समजला जाईल.


यावर अधिक वाचा :