गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (14:02 IST)

ट्विटरचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग' फीचर भारतात लाँच

आता ट्विटर सुद्धा लाईव्ह स्ट्रिमिंग करता येणार आहे. यासाठी असलेले लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर भारतातही लाँच केल आहे. यामुळे युझर्सना कार्यक्रम, बर्थ डे सेलिब्रेशन किंवा इतर अनुभव ट्विटरवर लाईव्ह शेअर करता येणार आहेत.  ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासाठी स्मार्टफोनमध्ये असणे आवश्यक आहे. कंपोज मेसेज या पर्यायामध्ये गेल्यानंतर कॅमेरा ऑप्शनमध्येच लाईव्ह स्ट्रिमिंगचा पर्याय दिलेला आहे.लाईव्ह स्ट्रिमिंग पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कॅप्शन द्यावं लागेल. कॅप्शन दिल्यानंतर तुम्ही गो लाईव्ह या पर्यायावर क्लिक करुन लाईव्ह करु शकता.