शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जुलै 2018 (09:06 IST)

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या भरमसाट फुगली आहे त्यात लक्षणीय घट होणार आहे. यासाठी ट्विटरवरील अनेक न वापरली जाणारी (लॉक्ड्) अकाउंटही बंद करण्यात येणार आहेत.  एखादे लॉक्ड् असलेल्या अकाउंटवरून अचानक काही वेगळा मजकूर लिहिला जातो. अफवा वा खोट्या माहितीची लिंक दिली जाते. आता टिष्ट्वटर मूळ वापरकर्त्याशी संपर्क साधणार आहे. उत्तर समाधानकारक न वाटल्यास ते अकाउंट बंद करण्यात येईल. 
 
राजकीय नेते, उद्योगक्षेत्रातले धुरिण, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार व अन्य मंडळी आपण किती लोकप्रिय आहोत हे दाखविण्यासाठी फॉलोअरच्या संख्येचा दाखला देत असतात. पण बनावट किंवा आॅटोमेटेड अकाउंटद्वारे ही संख्या फुगवली जाते असे काही उदाहरणांत दिसू आले आहे. 
 
याशिवाय समाजमाध्यमांद्वारे अफवा न पसरविण्याचे प्रकार खूप वाढल्याने हिंसक घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे केंद्राने फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर यांंना धारेवर धरले होते. अखेर टिष्ट्वटरने लाखो बनावट अकाउंट काढून टाकण्याचे ठरविले आहे.