गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017 (10:06 IST)

‘उमंग’ अ‍ॅपवर तब्बल 150 सेवा मिळणार

केंद्र आणि राज्य सरकारच्या तब्बल 150 सेवा एकाच अ‍ॅपवर आता मिळू शकणार असून या अ‍ॅपचे नाव ‘उमंग’ असे ठेवण्यात आले आहे. अ‍ॅपचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फोर न्यूज एज गव्हर्नन्स’ याचे लघुरूप म्हणजे ‘उमंग’ होय. अँड्रॉईड आणि आय-फोन वापरणार्‍यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे. 
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अ‍ॅप विकसित केले असून सीबीएससीच्या निकालापासून ते प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठीही या अ‍ॅपवरून अर्ज करता येणार आहे. प्रत्येक विभागाचे वेगळे अ‍ॅप असण्यापेक्षा एकाच अ‍ॅपवर सगळ्या विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘उमंग’ विकसित करण्यात आले आहे. लवकर कॉम्प्युटवरदेखील या अ‍ॅपचा वापर करता येईल.