शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (16:38 IST)

WhatsAppमध्ये येत आहे UPI पेमेंट फीचर

व्हाट्सऐप आपल्या वचनानुसार यूपीआय पेमेंट लाँच करण्याची पूर्ण तयारी करत आहे. पुढील महिन्यात ऐपमध्ये पेमेंट फीचर देण्यात येईल, ज्यानंतर यूजर्स व्हाट्सऐपद्वारे पैसे पाठवू आणि मिळवू शकतात.  
 
factordailyच्या रिपोर्टमध्ये व्हाट्सऐप यूपीआय पेमेंटची पुष्टी करण्यात आली आहे. रिपोर्टचे स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आले आहे ज्यात पेमेंटचे ऑप्शन दाखवण्यात आले आहे. सांगण्यात येत आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात   WhatsAppच्या बीटा वर्जनवर पेमेंट फीचरची टेस्टिंग होईल आणि महिन्याच्या शेवटापर्यंत किंवा डिसेंबरामध्ये फीचरला सर्वांसाठी जारी करण्यात येईल.  
 
सांगायचे म्हणजे या वर्षी जुलैमध्ये व्हाट्सऐपला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) पेमेंटसाठी हिरवा कंदील दिला आहे. एनपीसीआयकडून पर्मिशन मिळाल्यानंतर व्हाट्सऐप स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय आणि एक्सिस बँकांशी चर्चा करत आहे.