शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

चार राज्यात फेसबूकची ‘वाय-फाय एक्सप्रेस ’ सेवा सुरु

फेसबूकने  ‘वाय-फाय एक्सप्रेस ’ सेवेचा गुरुवारी भारतात शुभारंभ केला. या सेवेअंतर्गत फेसबूक ग्रामीण भागातील लोकांना सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबूकने आपली वादग्रस्त 'फ्री बेसिक्स' सेवा बंद केल्याच्या जवळपास एक वर्षानंतर ही नवी सेवा सुरु केली आहे. या नव्या योजनेसाठी दूरसंचार कंपनी एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे. कंपनी पुढील काही महिन्यात 20 हजाराहून अधिक वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करणार आहे. फेसबूकची ही वाय-फाय एक्स्प्रेस सेवा उत्तराखंड, गुजरात, राजस्थान आणि मेघालयात तब्बल 700 हॉटस्पॉटच्या माध्यमातून उपलब्ध आहे.