गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 23 एप्रिल 2014 (12:24 IST)

अँपल करणार आयफोन, आयपॅडचे रिसायकलिंग

‘अँपल’ने त्यांच्या वापरल्या गेलेल्या सर्व उत्पादनांचे रिसायकलिंग करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर त्यांची सर्व स्टोअर्स, कार्यालये आणि डेटा सेंटर अपारंपरिक ऊर्जेवरच चालविली जाणार असल्याचेही सांगितले आहे. उपकरणे व ऑनलाईन सर्व्हिसेसमुळे होत असलेले प्रदूषण कमी करण्यासाठी हा निर्णय अँपलने घेतला आहे. अँपलला ग्रीनर अँपल इंक बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कंपनीचे सीइओ टीम कुक यांनी जाहीर केले आहे. कंपनीने त्यांच्या कॅलिफोनिर्यातील क्युपरटिनो कार्यालयात अपारंपरिक उर्जेचा वापर वाढविला आहे. तसेच जगभरातील 420 स्टोअर्समधून गिफट कार्ड देण्याची व्यवस्था केली आहे. यानुसार पुन्हा विकले जाऊ शकतील असे आयफोन, आयपॉड, आयपॅड यूजर एक्स्चेंज करू शकणार आहेत.

रिसायकलिंगसाठी कोणताही चार्ज कंपनी आकारणार नाही. टाकावू उत्पादने जमिनीत पुरली जातात मात्र त्यात असलेल्या टॉक्सीक्समुळे प्रदूषण वाढत जाते. ते कमी करण्यासाठी अँपलने हे पाऊल उचलले असून अपारंपरिक ऊर्जेत सौर, पवन, जल उर्जेचा वापर कंपनी करणार आहे. अँपलच्या चार डेटा सेंटरमध्ये तसेच 120 स्टोअर्समध्ये अपारंपरिक उर्जेचा वापर सुरूही झाला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.