बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (17:07 IST)

अबब! 22 करोड रुपयांचा हा कम्प्युटर

अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही.. ‘अँपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर..नुकताच हा कम्प्युटर विकला गेलाय. 36 लाख डॉलर्सला (म्हणजेच, जवळपास 22 करोड रुपये) हा कम्प्युटर विकला गेलाय. आपल्या करिअरच्या सुरुवातीला स्टीव्हनं हा कम्प्युटर डिझाईन केला होता. ‘क्रिस्टी’कडून आयोजित करण्यात आलेल्या लिलावात अँपल-1 मॉडलच्या 50 दुर्मीळ कम्प्युटर्सवर बोली लावण्यात आली. यातील एका कम्प्युटरवर अमेरिकेच्या एका व्यक्तीनं 36.5 लाख डॉलर्सहून जास्त बोली लावली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जॉब्सनं 1976 मध्ये कॅलिफोर्नियाच्या पालो ऑल्टोमध्ये आपल्या गॅरेजमध्ये एक कम्प्युटर बनवला होता. हा कम्प्युटर त्याचा कौटुंबिक मित्र चार्ली रिकेटस्नं 600 डॉलर्सला (जवळपास, 37 हजार 587 रुपये) विकत घेतला होता.