शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (13:36 IST)

अॅपलचे मुख्याधिकारी म्हणतात, मी 'गे'

अॅपल या प्रसिद्ध कंपनीचे मुख्याधिकारी टॉम कुक यांनी आपण समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिली असून, समलिंगी असण्याचा आपल्याला अभिमान आहे.  
 
कुक यांनी ब्लुमबर्ग बिझनेसवीकमध्ये काल (गुरुवार) लेख लिहून ‘गे‘ असल्याचा जाहीर खुलासा केला आहे. कुक म्हणाले, ‘माझ्या लैंगिकताबाबत आजपर्यंत कधीही खुलासा केला नव्हता. परंतु, माझ्या कंपनीतील काही सहकाऱ्यांना याबाबत माहिती होती. वैयक्तिक माहिती काही कारणास्तव जाहीर केली नव्हती. ‘गे‘ असल्याचा मला अभिमान आहे. शिवाय, देवाने मला दिलेली ही मोठी भेट आहे.‘ 
 
‘ऍपल‘ कंपनीमध्ये सहकाऱयांसोबत काम करायची संधी मिळाली हे मोठे भाग्य आहे. सहकाऱ्यांनी काम करताना मोठा पाठिंबा दिला आहे.