गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2015 (10:54 IST)

आता ई-मेल सर्चिग होणार सोपे

अनेकदा ई-मेलमध्ये आपल्याला हवी ती माहिती ‘सर्च’ करणे त्रासदायक ठरते. एखादी माहिती सर्च करण्यासाठी आपण कीवर्ड टाकतो त्यावेळी त्या कीवर्डचा समावेश असलेले अनेक ई-मेल्स आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आणि त्यावेळी आवश्यक असलेला ई-मेल शोधणे कठीण होते. युझर्सची ही अडचण लक्षात घेत ‘याहू’ त्यांच्या ई-मेल सेटिंगमध्ये काही बदल करणार आहे. या बदलांनंतर याहू मेलमध्ये माहिती शोधणे सोपे होईल. ‘याहू मेलच्या रचनेत बदल करण्यासाठी आम्ही सुमारे एक वर्षापासून प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे,’ असे याहूच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. याहू मेलमधील हे बदल पुढील आठवडय़ापासून लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आपल्याला हवी असलेली माहिती सर्च करण्यासाठी आपण कीवर्ड टाकण्यास सुरुवात केली, त्या कीवर्डचा समावेश असलेले विविध पर्याय लगेच आपल्यासमोर दिसतील. यासोबतच याहूच्या इमेलसोबत जोडल्या जाणार्‍या अटॅचमेंटस् आणि लिंक्समध्येही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. सर्च करणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी ई-मेलच्या उजव्या कोपर्‍यात एक सर्च बटन असेल. तुमचा याहू मेल, फेसबुक, ट्विटर किंवा लिंकेडिन यापैकी कुठल्याही सोशल नेटवर्किग साइटशी लिंक केला असेल तर मेलवरून तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहात त्यांचे प्रोफाइल पाहणे शक्य होईल.
 
ई-मेलच्या स्वरूपात काही बदल केलेले असले तरी ते परिपूर्ण झालेले नाहीत, असे याहूच्या अधिकार्‍यांचे मत आहे. त्यामुळे या बदलांशी सुसंगत असे आणखी काही बदल आगामी महिन्यांत केले जाण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेली गुगल कंपनीसुद्धा ई-मेलच्या स्वरूपात काही बदल करण्याच्या तयारीत आहे.