शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 14 नोव्हेंबर 2015 (09:33 IST)

आता, गुगल मॅप वापरा तोही इंटरनेटशिवाय!

आता इंटरनेटशिवायही गुगल मॅप काम करू शकणार आहे. आपल्या मॅपसाठी ऑङ्खलाइन नेव्हिगेशन आणि सर्च फीचर देणार असल्याचे गुगलने जाहीर केले आहे. यामुळे, इंटरनेटशिवाय युजर्स नेव्हिगेशनचा वापर करू शकतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर खजड अँप युजर्सही वापरू शकणार आहेत.
 
युजर्स या फीचरमुळे त्यांना हव्या असलेल्या भागाचा मॅप डाउनलोड करून आपल्या स्मार्टङ्खोनमध्ये सेव्ह करून ठेऊ शकतात. यामुळे, त्यांना हवे तेव्हा इंटरनेटशिवाय ते हा मॅप पुन्हा उघडून पाहू शकतील. शिवाय इंटरनेटशिवाय मॅपच्या साहाय्याने नेव्हिगेशन करू शकतील. इंटरनेट कनेक्ट झाल्यानंतर हा मॅप पुन्हा एकदा लाइव्ह होईल. यामुळे युजर्सना रिअल टाइम ट्राफ्रिकचीही माहिती मिळेल. गुगलच्या म्हणण्यानुसार, जगातील 60 टक्क्यांहून अधिक लोकांकडे फास्ट इंटरनेट नाही. यामुळे त्यांना मॅप नॅव्हिगेट करताना अनेक समस्या येतात. गुगल मॅपच्या या ऑफलाइन नेव्हिगेशन फीचरच्या माध्यमातून लोक सहजरीत्या नेव्हिगेट करू शकतील.