गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (14:17 IST)

आता ट्विटरवर करा ऑनलाइन शॉपिंग

आपण नेहमी ऑनलाइन शॉपिंग करत असतो. मात्र आता ऑनलाइन शॉपिंग पोर्टल अमेझॉनद्वारे ट्विटरच्या मदतीने ही उत्पादने विक्री केली जातील. अमेझॉन युर्जस आता केवळ एक ट्विटच्या माध्यमातून उत्पादनांना आपल्या विश लिस्टमध्ये जोडू शकतील. त्यानंतर त्यांना मेल किंवा ट्विटरद्वारे माहिती दिली जाईल. कंपनीने यासाठी एक हॅशटॅग बनवले आहे; ज्याचा वापर युर्जसला करावा लागेल. अमेझॉनचा हा हॅशटॅग इंजिन ट्विटरवर या टॅगला फॉलो करेल आणि युर्जसची वेगळी लिस्ट तयार करेल. या लिस्टला युर्जस पुन्हा अमेझॉनवर पाहू शकेल आणि आपल्या मनाला आवडेल ते तो खरेदी करू शकतो. मात्र यासाठी युजरला ट्विटरवर आपल्या अमेझॉन अकाऊंटला जोडावे लागेल. सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना आकर्षित करणे आणि सामान विक्री करण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून चालू आहे. ट्विटरनेसुद्धा सोशल शॉपिंगला वाढवण्यासाठी गुंतवणूक केली आहे. सूत्रांच्या मते फेसबुक व ट्विटरवर दोन्ही आपल्या वेबसाईटवर दिसणारे 'बाय' म्हणजे खरेदी करण्याचे बटन चेक करत आहे.