गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2015 (11:39 IST)

आता व्हॉट्स अँपवरही जाहिरातींच्या मेसेजचा त्रास

आतापर्यंत एमएमएसद्वारे पाठवले जाणार्‍या जाहिरातींच्या मेसेजमुळे बरेच जण त्रासले होते, पण आता इन्स्टंट मेसेजिंग अँप व्हॉट्स अँपवरही अशाप्रकारचे मेसेज यूजर्सना त्रास देण्याची शक्यता आहे. व्हॉट्स अँपचे मालकी हक्क असलेली कंपनी फेसबुकने व्हॉटस्अँपच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी दिली आहे. फेसबुकने 19 अब्ज डॉलर मोजून व्हॉट्स अँप विकत घेतलं होतं. पण फेसबुक आता व्हॉट्स अँपच्या व्यावसायिक वापरासाठी विविध कंपन्यांशी बातचीत करून जाहिरात मिळवण्याबाबत विचारणा करत आहे.
 
व्हॉट्स अँपच्या यूजर्सची संख्या सध्या 80 कोटींहून जास्त आहे. यात 2009 नंतर तेजीने वाढ होत आहे, विशेषत: युरोप आणि आशियात. मात्र तरीही व्हॉट्स अँपची कमाई फारच कमी आहे. त्यामुळे फेसबुक व्हॉट्स अँपच्या व्यावसायिक वापरासाठी प्रयत्न करत आहे. ऑक्टोबरमध्ये फेसबुकने सांगितलं होतं की, व्हॉट्स अँपला 2014 च्या पहिला सहामाहीमध्ये 1.6 कोटी डॉलरचं उत्पन्न मिळालं होतं, पण या काळात व्हॉट्स
अँपचं 23.2 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. आम्हाला असं वाटतं की व्हॉट्स अँपला बीटूसी (बिझनेस टू कन्झ्यूमर) किंवा व्यावसायिक मेसेजच्या आदान-प्रदानासाठी वापर करण्याची परवानगी देणं आमच्या बिझनेससाठी योग्य ठरू शकतं, असं फेसबुकचे मुख्य अर्थ अधिकारी डेव्हिड वेहनर यांनी म्हटलं आहे.