शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 (10:10 IST)

आस्कमीबझारची हायपरलोकल सेवा आता ७० शहरांत

मुंबई: देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली ऑनलाईन बाजारपेठ आस्कमीबझार डॉट कॉमने आपल्या हायपरलोकल या सेवेबद्दल प्रचंड आशावादी असल्याचे जाहीर केले. या सेवेद्वारे विविध विभागांत उपलब्ध करून दिली जात असून त्यात घर, कार्यालय, वैद्यकीय उपकरणे आणि फर्निचर यांचा समावेश आहे. या सेवेद्वारे दररोज एक दशलक्ष डॉलर्स किमतीचे व्यवहार होत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे़. 
 
हायपर लोकल सेवा ही स्थानिक स्रोतांच्या सेवेवर आधारित असून त्याद्वारे खरेदीदार आणि विक्रेते यांची गाठ घालून देत ग्राहकांना समाधान मिळेल, याकडे लक्ष दिले जाते. हायपरलोकल ही शहर आधारित सेवा असून त्याअंतर्गत स्थानिक खरेदीदारांच्या गरजा पुरवण्यासाठी स्थानिक विक्रेत्यांची यंत्रणा उपलब्ध करून दिली जाते आणि अधिक वेगवान डिलिव्हरीही मिळते. या पद्धतीत वाहतुकीदरम्यान मालाचे नुकसान होत नाही. स्थानिक वॉरंटी तसेच बिलिंग मिळते. हायपरलोकलमुळे इतरही अनेक सेवा मिळतात, ज्यामध्ये घाऊक प्रमाणाची सहज उपलब्धता आणि स्थानिक डील्सचा समावेश आहे. हायपरलोकल पद्धती विक्रेता समाजासाठी वरदान आहे कारण यामुळे त्यांना स्थानिक खरेदीदार वर्ग तयार करता येतो तसेच खरेदीदाराकडून झटपट लाभ मिळतो. 
 
आस्कमीबझारच्या नेक्स्ट डे डिलिव्हरी (एनडीडी) सेवेमुळे ग्राहकाला ऑर्डर नोंदवल्यानंतर कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता दुसऱ्याच दिवशी मालाची डिलिव्हरी मिळवता येते. सध्या ही सेवा देशातील २५ शहरांमध्ये उपलब्ध असून पुढील दोन महिन्यांत आणखी २५ शहरांमध्ये ती लाँच केली जाणार आहे.