शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 6 नोव्हेंबर 2014 (16:35 IST)

इंटरनेटवर वेळ वा घालवणार्‍यांसाठी कोर्स

इंटरनेट आजच्या काळातील प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक लोक रात्रीचा दिवस करून नेटवर वेळ घालवताना दिसतात. परंतु अशा प्रकारे वेळ घालवण्याचाही त्यांना चांगले फळ मिळणार आहे. कारण या वाया घालवलेल्या वेळेसाठी त्यांना चक्क  पदवीही मिळवता येणार आहे. 
 
 
अमेरिकेत पेनसाल्व्हेनिया विद्यापीठ अशा वेळ घालवू लोकांसाठी वेस्टींग टाइम ऑन इंटरनेट नावाचा अभसक्रम सुरू करणार आहे. विद्यापीठातील इंग्रजी विभागात आगामी शैक्षणिक सत्रापासून हा अनोखा अभसक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमात रचनात्मक लेखन व इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून तया करण्यात आला आहे. या अभसक्रमासाठी लॅपटॉप अनिवार्य असून तीन तासांपर्यंत इंटरनेटवर काम करावे लागेल. अभसक्रमासाठी ग्रेडींग सिस्टम असून अभ्यासार्थीना जॉन केज, बेट्टी फ्रिडेन आदी विचारवंतांनाही अभ्यासावे लागेल. अभसक्रमाचे नाव जरीही वेस्टींग कोर्स असे असले तरीही विद्यार्थ्यांना त्यातून काही रचनात्मक उत्पादन अथवा कार्य करून दाखवावे लागेल. जेणेकरून त्याचा वापर इंग्रजी साहित्यासाठी करता येईल.