शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जानेवारी 2015 (16:26 IST)

इमेजचे होणार भाषांतर

तुम्ही परदेशवारी करण्यासाठी गेला आहात आणि तुम्हाला त्या देशाची भाषा माहीत नाही. तुमच्यासमोर विदेशी भाषेतील साइन बोर्ड किंवा रेस्टॉरन्टचे मेनुकार्ड आहे. मात्र, ते तुम्हाला वाचता  येत नाही. परंतु, आता विदेशी भाषेतील बोर्डचे तुम्हाला अवगत असलेल्या भाषेत भाषांतर करून मिळणे सहज शक्य झाले आहे. 
 
विदेशी भाषांची माहिती नसलेल्यांसाठी गुगल ट्रान्सलेटरची अतिरिक्त सेवा चमत्कारापेक्षा कमी नाही. यापूर्वी गुगल ट्रान्सलेटरमुळे आपल्याला माहिती नसलेल्या शब्दांचे हव्वा असलेल्या भाषेत क्षणभरात भाषांतर करून मिळणे शक्य होते. मात्र, आता त्यापुढे एक पाऊल गुगलने टाकले आहे. भाषांतर अपेक्षित असललेल्या शब्दांचा केवळ आपल्या मोबाइलच्या कॅमेराने फोटो काढायचा आणि तो फोटो गुगल ट्रान्सलेटरवर टाकायचा. यासाठी गुगलचे अक्वायर्ड ट्रान्सलेशन अॅप वर्ड लेन्स डाऊनलोड करावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने गुगल आणि क्विस्ट व्हिज्युअल यांची मदत मोलाची ठरू शकणार आहे. क्विस्ट व्हिज्युअलच्या या अविष्कारी तंत्रामुळे कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये येणार्‍या भाषेच्या अडसरामुळे जाणून घेणे शक्य नसलेल्या गोष्टींची आपल्या भाषेत माहिती सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. वर्ड लेन्स मोफत डाऊनलोड करता येणार आहे. गुगलकडून अपडेट व्हर्जन आल्यानंतर ते मोफत डाऊनलोड करता येऊ शकणार नाही. स्क्रीनशॉटद्वारेही वेगाने आणि थेट भाषांतर करणे शक्य होऊ शकणार आहे. केवळ इंग्रजीच नव्हे तर कोणत्याही भाषांमध्ये तत्काळ भाषांतर करणे शक्य आहे.