शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2016 (11:39 IST)

एकदाच चार्ज केल्यावर आठवडाभर सुरू राहील मोबाइल

लवकरच मोबाइलला आठवडय़ात एकदाच चार्ज करावे लागणार असून मोबाइल फोनसाठी एक स्मार्ट ग्लास ब्रिटनच्या संशोधकांनी बनविला असून यामुळे बॅटरी खर्च होणार नाही. 
 
हा शोध स्मार्टफोनच्या युगात उपयुक्त ठरू शकतो. यामुळे 90 टक्के बॅटरी मोबाइलमध्ये स्क्रीनसाठी खर्च होते. अशा स्थितीत वापरकर्त्याला रोज मोबाइल फोन चार्ज करावा लागणार नाही आणि आठवडय़ात फक्त एकदाच चार्ज करावा लागेल. तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या बॅटरी कमी खर्च करण्याशी संबंधित संशोधन करत आहेत. परंतु मोबाइलची स्क्रीन बदलल्यामुळे सर्वात चांगले परिणाम पाहावयास मिळतील असे संशोधकांचे म्हणणे आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी संबंधित इंजिनियर डॉ. रेयमेन हॉसिनी जे या संशोधनाशी निगडित आहे, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही प्रत्येक रात्री आपला मोबाइल चार्ज करण्यासाठी लावतो, परंतु आम्ही स्मार्ट ग्लासचा वापर केला तर आठवडय़ात एकदाच मोबाइल फोन चार्ज करावा लागेल. अनेक कंपन्या मोबाइलची बॅटरी दीर्घकाळापर्यंत चालावी यासाठी काम करत आहेत. यात एक नाव अँपलचेदेखील आहे. अँपलने चालूवर्षी याच्याशी संबंधित एका तंत्रज्ञानाचे पेटंटदेखील घेतले आहे. या तंत्रज्ञानाने मोबाइलची बॅटरी अनेक आठवडय़ांपर्यंत चालेल, असे अँपलचे म्हणणे आहे.