शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 12 नोव्हेंबर 2014 (14:16 IST)

ऑनलाइन खरेदीसाठी 'अॅप्स'

इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करणार्‍यांची वाढती संख्या लक्षात घेऊन अशा मोबाइलधारकांना केंद्रस्थानी ठेवून उपयुक्त अशा नवनवीन अँप्लिकेशन्स् विविध कंपन्यांकडून निर्मिती केली जात आहे. इंटरनेटवरून वाट पाहत करण्यात येणार्‍या ब्राऊझिंगपेक्षाही जलदगतीने कार्यरत असणारे अँप्लिकेशन्स् नक्कीच उजवी ठरतात.
 
खरेदीसाठी वेळच न मिळणार्‍या वा खास वेळ काढून खरेदी कंटाळा करणार्‍यांसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय म्हणजे पर्वणीच. खरेदीचे बदलते ट्रेण्ड्स लक्षात घेऊन ऑनलाइन पोर्टल्स जसं गूगल, रेडिफ, याहू वा इतर काही वेबसाइट्स, तसेच स्मार्ट फोन्स् आणि आयफोनच्या सिरीजमध्येही विविध स्तरांवर ऑनलाइन खरेदीची अँप्लिकेशन्स उपलब्ध असल्यामुळे आता घरबसल्या खरेदी करणे अधिकच सोपे झाले आहे. अशा काही अँप्लिकेशनविषयी.. 

ईबे..
 
ईबेच्या अँप्लिकेशन्समध्ये आपल्याकडील काही वस्तूंची विक्री करायची असल्यास त्या वस्तू आकर्षक सवलतीच्या दरामध्ये लिलावात काढता येतात. खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक लिलावामध्ये ठराविक वस्तूंची बोली लावतात. या लिलावादरम्यान ग्राहकांनी असलेल्या शंका वा प्रश्न मेसेजद्वारे विक्रेत्याला पाठवू शकतात. विक्रेता लिलावात आलेल्या सर्वोत्तम बोली पडताळून पाहू शकतो वा विक्री झालेल्या या अँप्लिकेश्नमध्ये आहे. याशिवाय विक्री न झालेल्या वस्तूंची नव्याने यादी तयार करता येणे, तसेच लिलावाचे नवीन वेळापत्रक तयार करणे, असेही काही खास पर्याय या अँप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. हे अँप्लिकेशन्स् अँण्ड्रॉइड, आयफोन, आयओएस, विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी या फोन्समध्ये डाऊनलोड करता येते.

अँमेझोन
 
अँमेझोन मोबाइल अँप्लिकेशन्स वापरणार्‍यांना खरेदी जलद गतीने करता येते. इतर अँप्लिकेशन्सवरील विक्रीसाठी असलेल्या उत्पादकांना दरांची तुलना करून खरेदी केल्याने पैशाची बचत होण्यासाठी मदत होते. उत्पादनाविषयी लोकांना दिलेल्या प्रतिक्रियाही वाचून त्या मित्रांसोबत शेअरही करता येतात. खरेदी करण्यासोबत नवनवीन उत्पादकांच्या लिलावांवरही लक्ष ठेवता येते. हे अँप्लिकेशन्स् अँण्ड्रॉइड, आयओएस, आयफोन आणि विंडोज फोन या फोन्समध्ये डाऊनलोड करू शकतो.
 
नापतोल
 
या अँप्लिकेशन्समध्ये ५00 हून जास्त प्रकारांमधील २ लाखांहून अधिक उत्पादकांची सविस्तर माहिती मिळवणे, त्या उत्पादनाविषयीच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया, उत्पादनांची वैशिष्ट्य आणि त्यावरील तज्ज्ञांची मते वाचता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना अन्य अँप्लिकेशन्समधील उत्पादनांच्या किंमतीशी तुलना करता येतात. हे अँप्लिकेशन्स अँण्ड्रॉइड, आयओएस, आयफोन, विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी या फोन्समध्ये डाऊनलोड करता येते.
 
रेडिफचे 'फ्री शॉपिंग अँप्लिकेशन्स्'
 
या आधी बाजारात उपलब्ध असलेल्या अँप्लिकेशन्समध्ये आता 'रेडिफ डॉट कॉम'ने तयार केलेल्या 'फ्री शॉपिंग अँप्लिकेशन्स्'ची नव्यानं भर पडली आहे. अँण्ड्रॉइड, आयओएस, आयफोन, तसेच आयपॅड, ब्लॅकबेरी-१0 आणि जावा या सॉफ्टवेअरचा समावेश असलेल्या मोबाइल फोन्समध्ये हे अँप्लिकेशन्स् वापरता येते. 
 
एखादे पुस्तक ऑनलाइन खरेदी करायचे असल्यास केवळ त्या पुस्तकाचा बारकोड स्कॅन करून त्याच्या साह्याने तुम्हाला त्या किंमत माहीत करून घेता येईल. हे याचे खास वैशिष्ट्य आहे. याशिवाय इतर अँप्सप्रमाणे याही अँप्समध्ये कपडे, अँक्सेसरीज आणि बॅग्ज घराच्या सजावटीचे साहित्य, क्रीडा किंवा व्यायामाचे साहित्य आणि ऑटिक्स्, खेळ, तसेच खेळणी आणि संगणक व त्या संबंधित वस्तू अशा अनेक वस्तूंच्या खरेदीचे पर्याय या अँप्लिकेशन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात खरेदी केलेले उत्पादन घरपोच आल्यानंतर त्याची रक्कम भरणे अथवा चेक, डिमांड ड्राफ्ट, नेटबँकिंग आणि डेबिट, क्रेडिट कार्ड यांसारखे पर्यायही सुरक्षितपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. गुगल प्ले, आयओएस, अँप्स् स्टोअर अँप्लिकेशन्स मोफत डाऊनलोड करता येते.
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील,  डाउनलोड करण्यासाठी  येथे  क्लिक  करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.