मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:35 IST)

किबोर्ड.. फोल्ड करा.. आणि सहजच कुठेही कॅरी करा!

तुमच्याकडे फोन किंवा टॅब आहे.. आणि त्यावर तुम्हाला एखादं काम तातडीनं पूर्ण करायचंय.. पण, टाईप कसं करणार..? या गॅझेटस्नाही एखादं छोटंसं आणि सोबत अगदी आरामात कॅरी करता येईल, असं किबोर्ड असतं तर किती बरं झालं असतं ना! असा साहजिकच विचार तुमच्या मनात आला असेल.. हीच तुमची गरज ओळखलीय ‘एलजी’ या कंपनीनं..एलजीनं ‘रॉली किबोर्ड’ नावाचा एक फोल्डेबल वायरलेस किबोर्ड लॉन्च करण्याची घोषणा केलीय. 
 
हा किबोर्ड तुम्ही सहज कुठेही नेऊ शकता.. येत्या महिन्यात बर्लिनच्या एका ट्रेड शो ‘आयएफए 2015’ मध्ये हा किबोर्ड लॉन्च होणार आहे. हा किबोर्ड चार फोल्डमध्ये गुंडाळला जाऊ शकतो. गुंडाळल्यानंतर तो एखाद्या छोटय़ा काठीप्रमाणे होईल. जो तुम्ही सहजच बॅगमध्ये कॅरी करू शकता. यावर तुम्ही सहज टाईपही करू शकता. कारण कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे याचे बटन्स 17 चच् चे आहेत.. म्हणजेच डेस्कटॉप किबोर्डपेक्षा थोडं छोटं.. डेस्कटॉप किबोर्ड 18 चच् असतात. किबोर्ड एकाच वेळी दोन डिव्हाईसला कनेक्ट केला जाऊ शकतो.. हा वायरलेस किबोर्ड ब्लूटूथ 3.0 सपोर्ट करेल. यामध्ये सिंगल --- बॅटरी लावण्यात आलीय. त्यामुळे जवळपास तीन महिन्यांपर्यंत तुम्ही हा किबोर्ड चार्ज न करता वापरू शकता. या किबोर्डची किंमत वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी असेल.. सप्टेंबर महिन्यात अगोदर अमेरिकेत लॉन्च केल्यानंतर तो इतर ठिकाणीही हळू-हळू उपलब्ध होईल.