शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 10 जून 2014 (10:25 IST)

खबरदार 'फेसबुक' आणि 'व्हॉट्स अॅप'वर आक्षेपार्ह मजकूर टाकला तर..

'फेसबुक', 'व्हॉट्स अॅप'सह अन्य सोशल नेटवर्क साईटवर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर टाकणारे तसेच लाईक व शेअर करणार्‍यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जातील, असे सकेंत राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटले आहे. हिंदु राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

गेल्या आठवड्यात राज्यातील महापुरुषांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर 'फेसबुक'वर टाकण्यात आला होता. त्यामुळे राज्यात मागील 8-10 दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. याचदरम्यान, पुण्यात मोहसिन शेख नामक एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या करण्यात आली होती. ही हत्या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणली होती. शेख याने हा मजकूर पोस्ट केल्याचा हिंदु राष्ट्र सेनेला होता. मात्र यात शेख याचा कोणताही सहभाग नसल्याचे आर.आर.पाटील यांनी सांगितले.