गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2016 (12:59 IST)

खुशखबर ! आता 50 रुपयात 20 जीबी 3 जी डेटा

भारतीय टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक खास 3जी ऑफरची सुरुवात केली आहे. एक यूजर इंटरनेट कनेक्शन घेऊन इतर 4 जणांसोबत तो शेअर करू शकतो. म्हणजेच तुम्ही हा पॅक अँक्टिव्हेट केला तर तुम्ही 4 लोकांसोबत तो शेअर करु शकता. फक्त यासाठी बीएसएनएल कनेक्शन असणं गरजेचं आहे.
 
डिजिटल इंडियाच्या अंतर्गत सुरु झालेल्या या स्कीममध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट सेवा पुरवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला वेगळा इंटरनेट प्लॅन घेण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला कमी किमतीत जास्त इंटरनेट वापरायला मिळेल. स्किम अँक्टिव्हेट  करण्यासाठी : 
1. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन या ऑफरला सब्सक्राइब करा. 
2. वेबसाइटवर जाऊन सेफ केअर पोर्टलवर क्लिक करा. 
3. येथे मोबाइल नंबर आणि इतर माहिती भरा. 
4. यानंतर तुम्हाला चार मोबाइल नंबर अँड करावे लागतील. 
5. प्लान अँक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही 3जी डेटा वापरू शकता. 
6. रजिस्टर केलेल्या नंबरवर तुम्हाला याचं बिल भरावं लागेल. 
7. या प्लानमुळे 50 रुपयात तुम्ही 20 जीबी डेटा वापरू शकता.