बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (11:52 IST)

गणेशाच्या आकारातील मस्त पेनड्राईव्ह

भारतात देशभर घरोघरी आणि सार्वजनिक रूपाने गणेश पाहुणे म्हणून विराजमान होणार आहेत. गणेश ही बुद्धीची आणि विघ्नहरण करणारी देवता असल्याने गणेश मूर्ती भेट म्हणूनही दिली जाते. फोटो, लॉकेट, अंगठय़ा, पेंडंट, मूर्ती, पेंटिंग अशा अनेक स्वरूपात या भेटी दिल्या जातात. आता गॅझेट स्वरूपातही गणेश भेट देणे शक्य झाले आहे. गणेशाच्या आकाराचे पेनड्राईव्ह ऑनलाइनवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे मस्त आकारातले हे पेनड्राईव्ह आकर्षक आहेतच पण सहज परवडणार या किमतीतही आहेत. एंटर यूएसबी 16 जीबी फ्लॅश ड्राईव्ह फ्लिपकार्टवर उपलब्ध असून त्याची किंमत आहे 735 रूपये. 
 
गणेश/गणपती यूएसबी पेन ड्राईव्ह 8 जीबीचा असून तो अँमेझॉन वर उपलब्ध आहे. त्याची किंमत आहे 799 रूपये. मोसार्बिअर स्पेशल एडिशन 4 जीबी गणेश पेन ड्राईव्ह स्नॅपडीलवर 519 रूपयांत मिळतो आहे. एंटर देवदेवा 8 जीबीचा पेनड्राईव्ह फ्लिपकार्टवरच 560 रूपयात उपलब्ध आहे. तर एचपीचा 32 जीबीचा पेन ड्राईव्ह होमशॉप 18 वर उपलब्ध असून त्याची किंमत आहे 1125 रूपये. 
 
मग आता वाट कशाची पाहताय? अगदी भेट म्हणून द्यायचे नसेल तर स्वत:साठीही ही खरेदी होऊ शकते. म्हणजे गणेशजी सतत तुमच्याजवळ या रूपाने राहू शकतील.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.