गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जून 2014 (11:33 IST)

गुगल खरेदी करणार ‘स्काबॉक्स’ कंपनी

लोकप्रिय सर्च इंजीन गुगलने आता सॅटेलाईट निर्मिती करणार्‍या स्काबॉक्स या कंपनीची 50 कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्याची तयारी केली आहे. या करारामुळे गुगल आता स्वत:चे कृत्रिम उपग्रह पाठवून हवाई छायाचित्रे आणि जगातील दूर असलेल्या भागांना ऑनलाइन सुविधा देऊ शकते. स्काबॉक्सच्या सॅटेलाईटमुळे गुगलचे नकाशे अद्यावत चित्रांसह अचूक असतील, असे स्काबॉक्स कंपनीने आपल्या प्रसिध्दी पत्रकात सांगितले आहे. आम्ही आशावादी आहोत. स्काबॉक्सची टीम आणि तंत्रज्ञान आपत्ती मदत आणि इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी गुगलला मदत करील, असे पत्रकात म्हटले आहे. अमेरिकेतील नियमांनुसार व्यवहार पूर्णत्वास जाईल, असे गुगलने सांगितले. अद्यापही करार पूर्ण झालेला नाही, असे स्काबॉक्सने जाहीर केले आहे. पाच वर्षापूर्वी आम्ही स्काबॉक्सचा प्रवास सुरू केला होता. तिच्या माध्यमातून पृथ्वीवर होणार्‍या हालचालींची माहिती ताबडतोब मिळते. त्या अनुषंगाने आम्ही प्रगती करत आलो आहोत. आम्ही जगातील सर्वात लहान-क्रांतिकारी प्रतिमा सॅटेलाईट बनवून ती प्रक्षेपित केली आहेत. याचद्वारे सुंदर, उपयोगी छायाचित्रे आणि दररोज व्हिडिओ मिळविले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने खास अशा टीमची बांधणी आणि तिला सक्षम करणे. आताची वेळ योग्य असून आम्हाला असलेली मोठी आणि साहसी आव्हाने या एकत्रीकरणातून आमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आधार मिळेल, असे स्काबॉक्स कंपनीने म्हटले आहे.

विशेषत: भौगोलिक माहिती सहज मिळेल आणि तिचा सहज वापर करता येईल, असे स्काबॉक्स आणि गुगलने आपल्या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे. संबंधित कंपन्या दोघांसमोर असलेल्या समस्या सोडवणार आहेत.