गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (17:04 IST)

गुगल झाले १८ वर्षांचे

सर्च इंजिन म्हणून संपूर्ण जगात सर्वाधिक वापरात असलेले आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधून देणारे सर्च इंजिन आहे गुगल आणि त्याच गुगलचा वाढदिवस आहे.गुगल आज १८ वर्षाचे असून  आज खऱ्या अर्थाने गूगल प्रौढ झालं आहे. या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे. या आगोदर गुगलने  १९९८ साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. . तारखेवरुन मोठा वाद कायम होता. मात्र त्यानंतर गेल्या २७ सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्या हिशोबाने आज गूगलचा १८ वाढदिवस आहे.
 
४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना केली होती. आता गुगलचे मुख्य अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे सुंदर पिचाई काम पाहत आहेत.
 
इंटरनेट वरील आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला गूगल शोधून देऊ शकतो. हे सगळ्यांना माहितीच आहे. पण गूगल वर कस सर्च कराव म्हणजे गूगल आपल्याला हवी असलेलीच माहिती देईल हे सुद्धा माहिती असणे महत्वाचे असते . गूगल वर सर्च करण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा समज चुकीचा असतो . सुरुवातीला हे आपल्याला समजून घ्यायला हव की गूगल हे एक एप्लीकेशन आहे अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे गूगल एखादी व्यक्ति नाहिये की आपल्याला जी माहिती हवी आहे ते आपल्याकडून नीट समजून घेईल आणि नंतर आपल्याला हवी असलेली माहिती पुरवेल . गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरुन तुम्हाला हवी असलेली गोष्ट सर्च करतो. गूगल कोणी मानुस नसल्याने त्याला व्याकरण कळत नाही . तुम्ही दिलेल्या शब्दांमधुन तो आहे तसेच शब्द कोणत्या वेबसाइट वर आहेत हे शोधतो. आणि तो आपल्याला रिजल्ट देतो. आणि म्हणूनच जरी आपण काही सर्च करताना व्याकरण चुकला तरी तो चुकीचा रिजल्ट देत नाही. म्हणूनच आपल्याला काही सर्च करायचा असेल गूगल वर तर मोजके शब्द लिहिले तरी आपला काम होउ शकत.