शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (11:08 IST)

गुगल : नवे अॅलो अॅप व्हॉट्स अॅपला टक्कर

व्हॉट्सअॅपला आता टक्कर देण्याकरिता आता गुगल सज्ज झाले आहे. गुगलकडून ने अॅलो या नावाचं नवीन अॅपचं एड्राईड आणि आओएस करिता बाजारात दाखल केले आहे.. हे अॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅपला यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
 
अॅलो अॅपबद्दल अनेक दिवसांपासून गुगलने वेळोवेळी माहित दिली. आता तर गुगलने याचा एक व्हिडिओ समोर आणला आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणेच या अॅपमध्ये आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. एचडी व्हिडिओ क्वालिटी, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअर आणि चाटिंगसह व्हॉट्सअॅपप्रमाणेच फीचर्स या अॅपमध्ये देण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपच अजून जगात मोठ प्रस्थ आहे मात्र गुगल सुद्धा काही कमी नाही आता युजर या नवीन मेसेजिंगला कसे उत्तर देतो आणि पसंत करोत हे पहावे लागेल.