शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 31 ऑक्टोबर 2015 (12:35 IST)

गुगल, व्हॉटस् अँप, फेसबुक करते हेरगिरी

सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गुगल, व्हॉटस् अँप आणि फेसबुक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडले आहे. गुगल ही एक जाहिरात कंपनी आहे. गुगल अँडवर्डस्च्या माध्यमातून पैसे कमवते. त्यामुळे गुगल वापरणार्‍या युजर्सवर हेरगिरी केली जात आहे. त्यांनी एखाद्या गोष्टीचा सर्च केला, त्यानुसार त्यांना जाहिराती पाठविल्या जात आहेत. त्यानुसार ते आपला व्यवसाय वाढवत आहेत. हेच त्यांचे बिझनेस मॉडेल आहे, यात काही चुकीचे नाही असेही अवास्टचे सीईओ व्हिन्सेंट स्टेक्लर यांनी म्हटले आहे. व्हॉटस् अँपही युजर्सच डाटाची हेरगिरी करत असल्याचे स्टेक्लर यांनी म्हटले आहे. यात व्हॉटस् अँप हे डाटा रिसिव्ह करते आणि त्यानुसार तुमची आवड लक्षात घेऊन फेसबुकवर जाहिरात येतात, असेही स्टेक्लर यांनी सांगितले. गुगलच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये लिहिल्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यात म्हटले आहे की, गुगलच्या सर्व्हिस जसे सर्च, जीमेल आणि मॅप वापरल्यास तुम्हांला त्या संदर्भातील जाहिरातील मिळतील, त्यामुळे त्यांनी गुगलच्या सर्व्हिस फ्री दिल्या आहेत.