शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑक्टोबर 2014 (14:53 IST)

गुगलने सुरू केली नवी ई-मेल सेवा

इंटरनेट सर्च इंजिन आणि ई-मेल सेवा देण्यामध्ये अव्वल स्थानी विराजमान असलेल्या गुगलने आपली इनबॉक्स ही नवी ई-मेल सेवा सुरू केली असून गुगलच्या या नव्या मेल सेवेमध्ये ई-मेलचे व्यवस्थापन अधिक उत्तम पद्धतीने करता येणार आहे. सोबतच यामध्ये अन्य सेवाही देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने नोकरी विषयक नव्या संधी, विमानाचे तिकीट बुकिंग, पॅकेज डिलिव्हरी आदींचा समावेश असणार आहे.
 
2004 मध्ये गुगलने स्वत:ची जी-मेल ही मेल सेवा सुरू केली होती. मेल सेवा देणार्‍यामध्ये जी-मेल सध्या सर्वात लोकप्रिय ठरले आहे. इनबॉक्स ही सेवा जी-मेल सारखी असली तरी ही पूर्णपणे स्वतंत्र अशी सेवा आहे. युझर्सच्या नेमक्या गरजा ओळखून ही सेवा सुरू केल्याचे गुगलने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. इनबॉक्सची सेवा स्मार्टफोन आणि आयफोनवर देखील वापरता येणार आहे.
 
इनबॉक्समध्ये युझर्सना रियर टाइम अपडेट मिळतील. यात खरेदी संदर्भातील अपडेट, मोबाइल रिमांईडर, बैठका आणि अन्य तपशीलाचे अपडेट इनबॉक्समध्ये देण्यात येणार आहेत. तसेच तुम्ही ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी स्टेटस आणि बँक खात्याचे तपशील देखील इनबॉक्समध्ये पाहता येणार आहे. जी-मेलमध्ये सध्या असलेल्या अनेक फिचर्स अधिक अपडेट स्वरुपात इनबॉक्समध्ये देण्यात आली आहेत.
 
गुगलची ही नवी ई-मेल सेवा सध्याच्या जी-मेल युझर्सना वापरता येईल. यासाठी ळपलेुसेसश्रश.लेा या आयडीवर ई-मेल पाठवल्यास त्यांना इनबॉक्ससाठीचे आमंत्रण पाठवण्यात येईल असे गुगलने म्हटले आहे.