शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2014 (14:38 IST)

गुगलवर ऐकता येणार मराठीचा ‘आवाज’

आयत्यावेळी कोणतीही माहिती लागलस आपण सर्वचजण ‘गुगल’वर सर्च करतो. सुशिक्षित नागरिकांना इंग्रजी येत असल्याने गुगलमधील माहिती आपल्याला चटकन मिळते. परंतु आता इंग्रजी न येणार्‍या आणि केवळ प्रादेशिक भाषाच अवगत असणार्‍या कोटय़वधी जनतेला या महाका सर्व इंजिनचा लाभ मिळणसाठी गुगलने चक्क प्रादेशिक भाषांची कास धरली आहे. त्यामुळे लवकरच तुम्ही मराठीतून सूचना केल्यास गुगल तुमच्यासमोर माहितीचा खजिना उघड करू शकेल.
 
गुगलने हिंदी भाषेतून आज्ञा देण्याची प्रणाली विकसित केली आहे. हिंदीतून आज्ञा दिल्यास तुम्हाला हवा तो मजकूर गुगल तुम्हाला देतो. आता देशातील 30 कोटी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी गुगलने मराठी, तमिळ, बंगाली भाषेत ही सेवा देण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पासाठी हिंदीतील वृत्तवाहिनी, वर्तमानपत्र, सरकारी संस्था व सीडॅक ही संस्था एकत्र आली आहे.
 
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.