शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2016 (22:47 IST)

जिओ देणार दीड वर्ष डेटा मोफत

रिलायन्स जिओने अजून एक धमाकेदार ऑफर बाजारात आणली आहे. यामध्ये नवीन आयफोन युझर्सना दीड वर्षांसाठी मोफत डेटा देण्याची घोषणा रिलायन्सने केली आहे. रिलायन्स स्टोअर्समध्ये आयफोनची खरेदी केल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
 
जिओ वेलकम ऑफरसोबतच 1499 रुपयांचा डेटा प्लॅन मोफत मिळणार आहे. ग्राहकांना दीड वर्षांसाठी अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जानेवारी 2017 पासून ही ऑफर सुरु होणार असून रिलायन्स स्टोअर्समध्ये आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येंणार आहे. त्यामुळे आता आय फोन विकत घेणारे आता दिवाळीत हा लाभ उठवणार आहे.
 
या ऑफरनुसार एसटीडी कॉल, 20 GB 4 GB डेटा, रात्री अनलिमिटेड 4 GB डेटा, 40 GB वायफाय डेटा आणि माय जिओ अॅपवर शॉपिंग अशा ऑफर आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहेत. या मध्ये  ऑफर मध्ये  आयफोन 6, आयफोन 6 एस, आयफोन एस प्लस, आयफोन एस ई, आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या फोन्सवर मिळणार आहे.