शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (12:58 IST)

जिओने केले ते योग्यच

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न जर एखाद्या कंपनीकडून होत असतील, तर त्यात चूक काय,’ अशा शब्दांत केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ‘रिलायन्स जिओ’च्या जाहिरातीत पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र वापरण्याचे समर्थन केले आहे. ‘रिलायन्स’ने पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र वापरण्यावरून बराच गदारोळ माजला असून, जोरदार टीका होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर केंद्राच्यावतीने प्रथमच एखाद्या मंत्र्याने या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आप’नेही याबाबत तीव्र टीका केली होती. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात रविशंकर प्रसाद यांचे खाते बदलण्यात आले असून, त्यांच्याऐवजी दूरसंचार खाते मनोज सिन्हा यांच्याकडे आले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या संदर्भात मोकळेपणाने चर्चा केली. ‘रिलायन्स जिओ’कडून मोफत व्हॉइस कॉल्स आणि स्वस्तात डेटा देण्यासंदर्भातील योजनेचेही सिन्हा यांनी कौतुक केले. अशा योजनांमुळे स्पर्धा आणखी तीव्र होईल आणि शेवटी त्याचा फायदा ग्राहकांनाच होईल. त्यामुळे अशा योजनांमध्ये गैर काहीच नाही, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले. ‘ट्राय’कडून एखाद्या कंपनीला फायदा होईल, असे निर्णय घेत जात असल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला.