गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (11:15 IST)

ट्विट होणार मोठे?

जगभरात ‘मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून लोकप्रिय असलेले ट्विटर आपल्या या महत्त्वाच्या वैशिष्ट्यामध्येच मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. ट्विटरवरीलसंदेशासाठी सध्या असलेली 140 कॅरेक्टर्सची मर्यादा ओलांडून त्याहून मोठे संदेश पाठवण्याची क्षमता असलेले फीचर विकसित करण्याच्या तयारीत कंपनी आहे. प्रारंभापासूनच ट्विटरने आपल्या संदेशांसाठी 140 कॅरेक्टर्सची मर्यादा ठेवली आहे. ही मर्यादा वाढवावी, याबद्दल वारंवार चर्चाही झाली आहे. ट्विटरने जूनमध्येच खासगी संदेशांसाठीची 140 कॅरेक्टर्सची मर्यादा उठवली होती. तर एपिलमध्ये कमेंटसह रीट्विट करण्याचा पर्याय यूजर्सना देऊन त्यांना अधिक स्पेस दिली होती. 
 
आता ट्विट्सचीच लांबी वाढवण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. ट्विटरचे हंगामी सीईओ जॅक डोर्सी हे या बदलांबाबत अनुकूल आहेत. ट्विटर आपल्या यूजर्सची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात असून यूजर्सना आपले मत व्यक्त करण्यासाठी अधिक स्पेस देऊन अधिकाधिक यूजर्सना आकर्षित करण्याचा उद्देश यामध्ये आहे. ट्विटरवरील मतप्रदर्शनास अधिक वाव देण्यासाठी अन्य काही उपायांची चर्चाही सुरू आहे. यामध्ये यूजर हँडल तसेच लिंक यांना गृहीत न धरण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे समजते.