मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (12:25 IST)

ट्विटरवर आता भाषिक गोडवा

लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर आता मायबोली मराठीचा गोडवा अनुभवता येणार आहे. कारण ट्विटर सात भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. याआधी तीन भारतीय भाषांचा समावेश होता, आता त्यात आणखी चार भाषांचा समावेश केला आहे. मराठी, गुजराती, कन्नड आणि तमिळमध्ये ट्विट उपलब्ध करण्यात आला आहे. 
 
आतापर्यंत केवळ इंग्रजीसह हिंदी आणि बंगाली या भारतीय भाषांमध्ये ट्विटर उपलब्ध होतं. यासोबतच या नव्या बदलानुसार स्मार्टफोन यूजर्सना भारतीय भाषांमध्ये ट्विटर वापरणे शक्य होण्यासाठी अँड्रॉइड अँप अपडेट केलं जाणार आहे.