शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2015 (10:58 IST)

तरुणाईची पसंती डेस्कटॉप व लॅपटॉपला

देशातील तरुणाई विशेषत: विद्यार्थीवर्ग संगणकाचा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचा वापर मोठय़ा प्रमाणावर करत असून निमशहरी भागासह छोटय़ा गावांमध्येही संगणक वापराचे प्रमाण वाढत असलचे स्पष्ट झाले आहे.
 
डेल या संगणक उत्पादक कंपनीने ग्रेहाऊंड रिसर्चच सहकार्याने केलेल्या ‘दी पीसी यूझर ट्रेंडस् ऑफ इमर्जिग इंडिया’ या सर्वेक्षणात हा कल आढळला आहे. यासाठी देशातील 40 ठिकाणांच्या सहा हजार प्रतिनिधींकडून माहिती घेण्यात आली. ज्ञान व कौशल्य वाढीसाठी संगणकाचा वापर वाढला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अहमदाबाद, सुरत, भोपाळ, बडोदा यांचा समावेश असलेल्या पश्चिम भागात मोठय़ा शहरांचे प्रमाण अधिक असलने येथे संगणक वापराचे प्रमाण अधिक आहे. 60 टक्के तरुणाईकडे घरात संगणक अर्थात डेस्कटॉप किंवा लॅपटॉप आहे. 15 वर्षाखालील 79 टक्के विद्यार्थना संगणक वापरायची परवानगी असते. 48 टक्के विद्यार्थी अभ्यासासाठी संगणकाचा वापर करतात. 54 टक्के लोक पाच तासांपेक्षा अधिक काळ वापर करतात. ऑनलाइन खरेदीसाठी संगणकाला अधिक पसंती मिळत असल्याचेही ही स्पष्ट झाले आहे, असे डेल इंडियाच्या स्मॉल बिझनेस अँन्ड कन्झुमर विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेंजर पी कृष्णकुमार यांनी सांगितले.