मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2016 (11:30 IST)

तुमच्या इंटरनेटचा स्पीड सांगणार नेटफ्लिक्स?

Fast.com नावाची एक वेबसाईट नेटफ्लिक्सने सुरु केली असून यूजर्सना ज्याद्वारे आपल्या इंटरनेट कनेक्शनचा स्पीड किती आहे, हे सांगितले जाणार आहे. मग तो मोबाइल असो, वा ब्रॉडबँड.
 
विशेष म्हणजे नेटफ्लिक्सची ही सेवा पूर्णपणे अँड फ्री असून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून मोबाइल किंवा ब्रॉडबँड इंटरनेटचा स्पीड किती आहे, हे जाणून घेऊ शकता. याबाबत ‘नेटफ्लिक्स’च्या माहितीनुसार, एखाद्या यूजरला ज्यावेळी व्हिडिओ स्ट्रीम करताना अडथळे येतात, त्यावेळी यूजर्स Fast.com चा वापर करुन डाऊनलोड स्पीड चेक करु शकतात. वेबसाईटवर यूजर्सच्या इंटरनेट स्पीडच्या तुलना करण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नेटफ्लिक्सच्या माहितीनुसार, स्पीड टेस्ट इंटरनेट कनेक्शनच्या आयएसपी स्पीड इंडेक्सपेक्षा वेगळे असते. प्राईम टाईमदरम्यान स्पीड इंडेक्समध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झालेल्या डेटाचा मासिक सरासरी स्पीड मोजले जाते.